
वैष्णवीला सलग आठ दिवस ‘या’ हत्यारांनी बेदम मारहाण
पती शशांकचे राक्षसी कृत्य, नणंद करिश्मा आणि चव्हाणकडूनही छळ, तपासात धक्कादायक खुलासा
पुणे – पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहे. हगवणेच्या वकिलांनी काल धक्कादायक दावे केल्यानंतर समाजमाध्यमात मोठा रोष दिसून आला. १६ मे रोजी घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
संपूर्ण हगवणे कुटुंब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस या कुटुंबाची कसून चौकशी करताना दिसत आहेत. आता पोलीस तपासात मोठी माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेला आत्महत्येपूर्वी, पती शशांक हगवणेकडून वेगवेगळ्या हत्यांरांचा वापर करुन मारहाण करण्यात आली होती. वैष्णवीला मारहण्यात करण्यात आलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले आहेत. सलग ८ दिवस वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दुसऱ्या बाजूला हगवणे कुटुंबातील सर्व सदस्यांचे बँक अकाऊंट गोठवण्यात आले आहेत. वैष्णवीला ननंद करिश्मा आणि तिचा मित्र निलेश चव्हाण यांच्याकडून तिला मानसिक त्रास दिला जात होता. सततच्या होणाऱ्या त्रासाबद्दल वैष्णवी हिने आपल्या मैत्रिणीला देखील सांगितले होते. ज्याचा विचार कधी केला नाही ते आपल्यासोबत होत आहे, असे वैष्णवीने म्हटले होते. वैष्णली ही घटस्फोट घेण्याचा देखील विचार करत होती. न्यायालयाने करिश्मा हगवणे, शशांक हगवणे, लता हगवणे यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार असलेल्या निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करुन दिशाभूल करणाऱ्या संतोष दत्तात्रय गायकवाड या व्यक्तीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णलीच्या चरित्र्यावर संशय घेणे योग्य नसल्याचे देखील तिच्या वडिलांनी म्हटले. हगवणे कुटुंबियांमुळे माझ्या मुलीचे लग्न दोन वेळा तुडले आणि नाईलाजाने मला मुलीचे लग्न करावे लागले, असा दावा कस्पटे यांनी केला आहे.