
जेलमध्ये अक्षय आठवलेकडुन वाल्मिक कराडला बेदम मारहाण
धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी घेणार वाल्मीक कराडची भेट, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाने खळबळ
बीड – मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख सूत्रधार वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार जेलमध्ये आहेत. कराड अन् गीते टोळी जेलमध्ये टोळीयुद्ध भडकल्याची मध्यंतरी चर्चा होती. पण आता धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांनी मोठा गाैप्यस्फोट केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
करुणा मुंडे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. मला ज्याप्रमाणे मारहाण झाली होती, त्याच प्रमाणे वाल्मिक कराडला जेलमध्ये मारहाण झाल्याची माहिती माझ्या सूत्रांनी दिली आहे, असा धक्कादायक दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. वाल्मिक कराडला तुरुंगात मारहाण करण्यात आली. त्याची दहशत आता संपली आहे. ज्याप्रमाणे मला मारहाण झाली होती, त्याचप्रमाणे वाल्मिक कराडलाही जेलमध्ये मारहाण झाल्याचे माझ्या सूत्रांनी सांगितले आहे. जेलमध्ये आठवले नावाच्या व्यक्तीने वाल्मिक कराडला जबर मारहाण केली आहे, असे सांगत आता लवकरच मी वाल्मिक कराडला जेलमध्ये भेटायला जाणार आहे. त्याने ३२०० लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुरुंगात पाठवले आणि आता तो स्वतः त्याच तुरुंगात आहे, असे मुंडे म्हणाल्या आहेत. मी बीडमध्ये आल्यानंतर मी शपथ घेतली होती की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची दहशत संपवून टाकणार आहे. वाल्मिकला भेटण्यासाठी आता परवानगी मागणार आहे आणि भेटीसाठी जेलमध्ये जाणार आहे.अजितदादानी अजून मंत्रीपद कोणाकडे दिले नाही. आज धनंजय मुंडे मंत्री नसेल तरी प्रशासन काही करत नाही. वाल्मीक कराड याला जेवण बाहेरून येते , झोपण्यासाठी खाटा देखील आहे जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. साठ वर्षाचा म्हातारा जेलमध्ये बसून दहशत पसरवत आहे.. प्रशासन नेमके काय करत आहे? असा सवाल देखील करूणा मुंडे यांनी केला आहे.
धनंजय मुंडेंचे कालेचिठ्ठे वाल्मिक कराडकडे आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा गेम करू शकतात, असा गौप्यस्फोट करुणा मुंडे यांनी काही दिवसापुर्वी केला होता. तसेच धनंजय मुंडे यांच्या ११ नंबरचा सीडीआर तपासाचा अशी मागणीही करुणा मुंडे यांनी केली आहे.