Latest Marathi News
Ganesh J GIF

वाल्मिक कराड माझे दैवत त्यांना आणि धनंजय मुंडेंना बदनाम करु नका

कुख्यात गुन्हेगार गोट्या गित्तेची या आमदाराला धमकी, धमकीचा व्हिडिओ व्हायरल, म्हणाला मी कराडचा उजवा हात...

बीड – वेगवेगळ्या गुन्ह्यांअंतर्गत फरार असलेला बीडमधील कुप्रसिद्ध आरोपी गोट्या गित्तेने शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचा उल्लेख करत गित्तेने धमकी दिली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनेकदा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप करत असतात . यावरुन गोट्या गित्तेने आव्हाड यांनी इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड तुमचे माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग येत आहेत. त्यात तुम्ही सॉरी सॉरी म्हणाताना दिसत आहेत. तुम्हा वंजारी समाजाचे नाही आहात. तुम्हाला वाल्मिक कराड यांची बदनामी करणे महागात पडणार आहे अशी धमकी गित्ते याने दिली आहे. धनंजय मुंडेंना बदनाम करू नका असं गित्तेने व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. रेल्वे रुळांवर बसून शूट केलेल्या या व्हिडीओमध्ये आपण वाल्मीक अण्णा कराड यांचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं आहे. मात्र आपण त्यांच्यासोबत कशातही सहभागी नव्हतो असा दावा गित्तेनं केला आहे. अंजली दमानिया यांनी मी मुली उचलून नेतो असा आरोप केला आहे. जर हे आरोप खरे असतील तर माझ्यावर दाखल झालेले गुन्हे दाखवा किंवा त्याचे पुरावे माध्यमांना द्या. पण विनाकारण माझ्यावर कोणतेही आरोप करु नका, माझ्यावर जे गुन्हे दाखल आहेत त्याची सजा मला होईल पण विनाकारण खंडणी, दरोडेसारखे गुन्हे करतो. वाल्मिक कराडचा उजवा हात असल्याचे बिनबुडाचे आरोप करु नका. असं तो म्हणतो आहे. हा व्हिडिओ जुना असून १६ जानेवारीचा असल्याचं सांगितलं जात आहे. महादेव मुंडे प्रकरणात गोट्या गित्ते आरोपी असल्याची माहिती आधीच मुंडे कुटुंबियांनी दिली होती. पोलिसांना गोट्या गित्ते सापडत नसताना दुसरीकडे मात्र गोट्याने इंस्टाग्राम अकाउंट वर व्हिडिओ पोस्ट केल्यानं चर्चांना उधाण आले आहे. हा व्हिडिओ परळी जवळील मालेवाडी परिसरातील रेल्वे मार्गावरचा असल्याचे बोलले जात आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणामुळे सध्या बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आहे. याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यामुळे मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!