
वाल्मिक करडाने एक, दोन नाहीतर तब्बल २५ खून केले
धक्कादायक माहिती समोर, कृष्णा आंधळेचाही मृत्यू झाल्याचा दावा, व्हिडिओ व्हायरल
बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
बडतर्फ पीएसआय रणजीत कासले यांनी एक व्हिडीओ शेअर करत वाल्मिक कराडने परळीत कमीत कमी २५ मर्डर केले असतील असा दावा केला आहे. वाल्मीक कराडने परळीत कमीत-कमी २५ जणांची हत्या केल्या आहेत. काहीचे तुकडे करुन नदीमध्ये, तळ्यामध्ये टाकले असतील, काहींना बॉयलरमध्ये टाकले असेल. तो मला आजही त्रास देतोये, जेलमधून फोन करतोय. माझ्याकडे आणखी एका हत्येचे पुरावे आहेत, जे मी दुसऱ्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दाखवेन. एका १४ वर्षांच्या मुलाची हत्या कशाप्रकारे झाली, ते दाखवतो. फोटो आहेत माझ्याकडे’, असा दावा बडतर्फ कासले यांनी केला आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणादरम्यानचं एसपी आणि वाल्मीक कराडचे कॉल डिटेल्स चेक करा. तेव्हा कळेल खरा आरोपी कोण आहे. तत्कालीन एसपी नंदकुमार ठाकूर आणि वाल्मीक कराडचे दिवसातून दहा कॉल व्हायचे. फरार कृष्णा आंधळेचे देखील पुरावे होते. कृष्णाचा खून झाला आहे की काय? हे सगळं आता मी पुराव्यानिशीच बोलणार आहे. सरकारने माझे खोटे गुन्हे परत घेतले, तर मी पुरावे द्यायला तयार आहे’, असे रणजीत कासले म्हणाले आहेत.
आधीही वाल्मीक कराड सध्या बीडच्या कारागृहात आहे. मात्र येथे त्याला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याने केला होता. गुजरातमध्ये जाऊन आरोपींशी आर्थिक तडजोड केल्याच्या आरोपामुळे कासलेला निलंबित करण्यात आले होते.