
अश्लील कृत्य करताना भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
भररस्त्यात भाजपा नेत्याचे महिलेसोबत अश्लील कृत्य, गुन्हा दाखल, सीसीटीव्हीत नेत्याचा काळा कारनामा कैद
भोपाळ – मध्यप्रदेशमधील भाजपा नेता मनोहर लाल धाकड यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यात ते भररस्त्यात एका महिलेसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये धाकड यांची गाडी एक्सप्रेसवेवर थांबलेली दिसते. त्यानंतर एक महिला निर्वस्त्र होऊन बाहेर येते. नंतर मनोहरलाल देखील अर्धनग्न अवस्थेत बाहेर येतात. रस्त्याच्या मधोमध दोघेही शरीरसंबंध ठेवतात. हा प्रकार एक्सप्रेसवेच्या लेन ८ वरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच हा व्हिडिओ १३ मे २०२५ रोजीचा असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. मनोहरलाल धाकड हे उज्जैन येथील धाकड महासभेचे राष्ट्रीय मंत्री होते. व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, धाकड यांची पत्नी ही जिल्हा परिषद सदस्य आहेत. भानपुरा पोलीस ठाण्यात धाकड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एफआयआर दाखल झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश दीक्षित म्हणाले की, पक्षाला अशा गोष्टी करणाऱ्या लोकांची गरज नाही. या घटनेनंतर भाजपने मनोहरलाल धाकडवर कारवाई केली आहे. धाकडला युवा संघाच्या राष्ट्रीय मंत्रीपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. पोलिस तपास करत आहेत.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक पुरावे तपासले जात असून, याप्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे संबंधित नेत्याच्या भूमिकेवर आणि पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.