
बायकोच्या प्रायव्हेट प्रसंगाचे व्हिडिओ शुट करणाऱ्या निलेशचा व्हिडिओ व्हायरल
पिंकीचा मित्र निलेश चव्हाण फरार, बायकोला धमकी ते बाळाचे अपहरण, निलेश चव्हाण कोण आहे?
पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात करिश्मा हगवणे हिचा मित्र निलेश चव्हाणचेही नाव समोर येत आहे. आता या निलेश चव्हाण यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल झाला आहे. हा निलेश चव्हाण देखील मोठ्या कुरापती करणारा असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने स्वत:च्या पतीसोबत केलेल्या शारिरीक संबंधाचे असंख्य स्पाय कॅमेऱ्याच्या द्वारे असंख्य व्हिडिओ बनवल्याचे देखील समोर आले आहे. आता सोशल मिडीयावर सोशल मीडियावर त्याचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात तो कमरेला पिस्तुल खोचून, गाण्यावर नाचताना दिसत आहे. निलेश चव्हाणने वैष्णवीच्या बाळाला घेण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांना पिस्तुल दाखवत धमकावल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याच्या विरोधात शस्त्र कायद्याखाली कलम ३० आणि धमकी देणारे कलम ३५१(३) अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. निलेश चव्हाण फक्त वैष्णवी प्रकरणातच नाही तर त्याच्यावर पूर्वीही गंभीर आरोप आहेत. त्याने आपल्या पत्नीवर मानसिक आणि शारीरिक छळ केला होता. पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅम लावून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केले गेले. हे व्हिडीओ निलेशच्या लॅपटॉपमध्ये सापडले. पत्नीने जेव्हा जाब विचारला तेव्हा तिला चाकू दाखवत धमकावलं आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिच्या तक्रारीनंतर १४ जून २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. निलेश चव्हाणवर आधीपासूनच गुन्हे दाखल आहेत, त्यात आता बंदूक दाखवत धमकी, बाळाच्या ताब्यावरून वाद, आणि पत्नीवरील अत्याचाराचे प्रकार समोर आल्याने त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान वारजे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या भावाला आणि वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्याचे हगवणे कुटुंबाशी संबंध कसे होते? त्यांची ओळख कधीपासून आहे? याचा तपास सुरू आहे.
पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी स्पष्ट केलं की, निलेशचा लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याच्या वडिलांना, भावाला व साक्षीदारांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांची दोन विशेष पथकं सध्या निलेशच्या शोधात आहेत.