लाच घेणा-या वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
ऑनलाईन सिस्टीम येऊनही पोलीसांची कमाई सुरूच, पहा लाचखोरीचा व्हिडिओ
चंद्रपूर दि २७(प्रतिनिधी) – वाहतूकीचे नियम तोडल्यास दंडाची प्रकिया आॅनलाईन करण्यात आली आहे. यामुळे पोलीसांच्या लाचखोरीला आणि चिरीमीरी देऊन सुटका करुन येण्याला पायबंद बसावा असा हेतू होता. पण चंद्रपूर जिल्ह्यात महामार्गावर दुचाकी वाहन चालकांना वाहतूक पोलिसांकडून पैसे मागितले जात आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
चंद्रपूरातील पोलिसाचा लाच घेण्याचा प्रताप चालकाने कॅमे-यात कैद केला आहे. विशेष म्हणजे पोलीस दादागिरी करत असल्याचेही कॅमे-यात कैद झाले आहे.व्हिडिओत. एका रस्त्यावर ट्राफिक हवालदार आपल्या मोबाईलसह उभा आहे. त्याने एक दुचाकी थांबवली आणि तिच्या नंबर प्लेटचा फोटो घेतला. मात्र फोटो घेतल्यानंतरही हा ट्राफिक पोलीस दुचाकीस्वाराशी पैशाबद्दल बोलू लागला. अखेर तो चालक पोलिसाला पैसे देत स्वतःची सुटका करुन घेतो. का सर्व घटनाक्रम दुसरा दुचाकीस्वाराने कॅमे-यात कैद केला आहे. आॅनलाईन दंड वसुली सुरु झाल्याने लाचेला आळा बसेल असे वाटत होते. पण मोबाईलचा धाक दाखवत वरचे पैसे घेण्याचा व्यवहार कॅमे-यात कैद झाला आहे.
वाहन तपासणीच्या नावावर लोकांकडून पैसे घेऊन लूट सुरु असल्याचं चित्र समोर आलं आहे.या प्रकरणावर काय कारवाई होणार हे पाहण महत्त्वाचं आहे. पण यामुळे पोलीसांसह प्रशासनाच्या व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्या आहेत.