
पुण्यात एका बॉयफ्रेंडवरून दोन मुलींमध्ये तुफान हाणामारी
माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का करतेस? म्हणत दोन मुलींमध्ये झिंज्या ओढत हाणामारी,व्हिडिओ व्हायरल
पुणे – पुण्यातील येरवडा भागात एका बॉयफ्रेंडवरुन दोन मुलींमध्ये जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही घटना शाळेच्या आवारात घडली असून या तुफान हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
पुण्यातील येरवडा परिसरातील नेताजी शाळा परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास राडा सुरु झाला. “माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का करतेस?” असे म्हणत दोन मुलींमध्ये वाद सुरु झाला, त्यानंतर आणखी काही मुली भांडणात सामील झाल्या. यावेळी त्यांच्यामध्ये एकमेकांच्या झिंज्या ओढणे, लाथाबुक्क्या मारणे तसेच गलिच्छ शिव्या देणे सुरू केले. हा सगळा तमाशा पाहून नागरिक थबकवले आणि संताप व्यक्त केला आहे. गर्दीतील लोकांनी हा घडलेला प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही मुलींमधील वाद सुरूच होता. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साधारण १०.३० च्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलींची ही भांडण पाहून स्थानिक नागरिक अवाक् झाले. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आला असून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
शाळेसमोरच ही लज्जास्पद घटना घडली आहे. या गोंधळामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी यांना धडा शिकवावा अशी मागणी केली जात आहे. येरवडा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.