
राजा आणि सोनमच झाले होते शिलाँगमध्ये भांडण?
नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे प्रकरणात ट्विस्ट, सोनमचा शोध लागेना, खुनाचा दावा?
शिलाँग – मध्य प्रदेशमधील इंदोर येथील नव विवाहित राजा आणि सोनम रघुवंशी हे जोडपे हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. यात ते दोघेही अचानक गायब झाले होते. पण पोलिसांना दोन दिवसापूर्वी राजाचा मृतदेह मिळाला असून सोनम अद्यापही बेपत्ता आहे. पण या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत.
इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशी आणि सोनम यांचं ११ मे २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. लग्नानंतर २० मे रोजी नवविवाहित कपल हनिमूनसाठी गेले होते. त्यांचा आणि कुटुंबाचा शेवटचा संवाद २३ मेला झाला होता. पण त्यानंतर हे जोडपे गायब झाले होते. पोलिसांनी शोध सुरु केल्यानंतर २ जून रोजी वेईसावडॉन्ग धबधब्याजवळील खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला होता. पण सोनम अजूनही बेपत्ता आहे. पण आता शिलॉंगच्या स्थानिक वृत्तवाहिनीने जवळपास पाच मिनिटाचं सीसीटीव्ही फूटेज प्रसारित केला आहे. त्यात दिसत की राजा आणि सोनम हे हॉटेलमध्ये गेले. तिथून दोघेही पुन्हा स्कुटीवरून बाहेर निघतात. यात सोनमने एक रेनकोट आणि पांढरा शर्ट घातल्याचं दिसत आहे. असाच शर्ट राजाच्या मृतदेहाशेजालरी सापडला आहे. मेघालयातील जंगलात जिथं राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला तिथं सर्च ऑपरेशनवेळी जो रेनकोट सापडला तसाच रेनकोट सोनमने घातल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. तसेच सोनम आणि राजाचे येथील कॅफे ऑपरेटरशी भांडण झाले असावे असा कुटुंबाचा संशय आहे. या घटनेपासून कॅफे मालकही बेपत्ता आहे. पण, अद्याप पोलिसांनी या दाव्याला दुजोरा दिला नसून अद्याप याबाबत अधिकचा तपास सुरु आहे. तपासादरम्यान, सोनम रघुवंशी शेवटचे बोलणे हे तिच्या सासूशी झाले होते. यावेळी ते दोघेही धबधब्यावर जात असल्याचे सांगितले होते. आता या प्रकरणाचा गुंता वाढला असून सोनमचा शोध प्रामुख्याने घेतला जात आहे.
राजा त्याचा भाऊ विपिनच्या स्वप्नात आला होता आणि त्याची हत्या झाल्याचं सांगितलं. कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. इंदूरमध्ये राजाच्या कुटुंबाने घराबाहेर बॅनर लावले आहेत. ज्यावर “राजाचा आत्मा म्हणत आहे – मी मेलेलो नाही, मला मारण्यात आलं आहे. सीबीआय चौकशी झाली पाहिजे” असं म्हटलं आहे.