Latest Marathi News
Ganesh J GIF

टँकर चालकांना नागरिकांनी पैसे देऊ नये !

पुणे महापालिकेचे नागरिकांना आवाहन...

शहरात उन्हाळा वाढल्याने आता पाण्याची मागणी देखील वाढण्यास सुरूवात झाली आहे. शहरातील काही भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने या भागातील नागरिकांची गरज भागवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने अतिरिक्त टँकर दिले जात आहेत. ‘शहरातील काही भागांमध्ये महापालिकेच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो.

हा पाणीपुरवठा करताना टँकरचालक तसेच टँकरमालकांनी नागरिकांकडून पैशांची मागणी करू नये. पाण्याच्या टँकरसाठी पैसे मागितल्यास नागरिकांनीदेखील त्यांना पैसे देऊ नयेत,’ असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी हे आवाहन केले आहे. ‘जे टँकरचालक तसेच टँकरमालक नागरिकांकडून पैसे घेतील त्यांना पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल,’ असा इशाराही जगताप यांनी दिला आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने शहराच्या काही भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिकेच्या वतीने पाणी देण्याची जबाबदारी असलेले टँकरचालक, मालक संधीचा फायदा घेऊन नागरिकांकडे पाण्याच्या टँकरसाठी पैशांची मागणी करतात. काही नागरिक गरजेपोटी पैसेही देतात. मात्र, अनेक ठिकाणी यामधून वाद होतात. या संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी आल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!