पुणे प्रतिनिधी – रोहित पवार । सहा जणांच्या टोळक्याने घरात घुसून दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हतातील कोयते हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये पडला तर त्याचा कार्यक्रम करु असे म्हणत दहशत पसरवली. हा प्रकार सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास म्हातोबाची आळंदी येथील पाटील नगर येथे घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सहा जणांवर विविध कलमांतर्गत आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अंजनाबाई अंकुश दांडेकर (वय-50 रा. म्हातोबाची आळंदी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरुन निखिल केसरकर, रोहीत एकनाथ वाल्हेकर, पप्पु काळे व त्याच्या इतर तीन मित्रांवर आयपीसी 143, 144, 147, 148, 149, 452, 323, 504, 506, सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्य़ादी यांच्या घरात घुसून त्यांच्या दोन मुलांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच घराच्या पत्र्यावर कोयते व दगड मारुन नुकसान केले. यानंतर फिर्यादी व त्यांच्या मुलांना शिवीगाळ करुन घर सोडून जाण्याची धमकी दिली. आरोपी पैकी एकाने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवुन आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये पडला तर त्याचा कार्य़क्रम करु असे म्हणत दहशत पसरवली. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.