
नवरदेवाला पाहताच भारवलेल्या नवरी केले असे काही…
नवरीचा व्हिडीओ व्हायरल, नवरदेवाचे हावभाव चकित करणारे, नवरीचा व्हिडीओ बघाच!
पुणे – लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण असतो. कारण अनेकांचे आयुष्य या नंतर प्रेम आणि स्नेहा बरोबरच जबाबदारीची देखील जाणीव करुन देणारा असतो. कारण एक मुलगा आणि मुलगी एकत्र येऊन नवीन आयुष्याची सुरुवात करणार असतात. सध्या अशाच एका नवरीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
लग्न म्हटलं की, मजा मस्ती, चालीरिती अन् नाच गाणी सगळं काही आलंच. लग्नात वधू वरांप्रमाणे कुटुंबीय आणि मित्रांसोबत देखील खूम मजा करतात. यावेळी नवरदेव आणि नवरी हे लग्नाचे मुख्य आकर्षण असतात. आजकाल लग्नाची परंपरा जरा वेगळी झालीये. अनेक लग्नात संगीत हा प्रकार पहायला मिळतो. यात नवरा किंवा नवरी भन्नाट डान्स करुन आपल्या जोडीदाराचे स्वागत करत असतात. एका नवरीने आपल्या नवरदेवाच्या स्वागतासाठी भन्नाट असा डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरीने पिवळया रंगाची नऊवारी साडी नेसली आहे आणि मैत्रीणींसोबत भन्नाट असा डान्स केला आहे. “राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का?” या मराठमोळ्या गाण्यावर नवरीनं डान्स केला आहे. यावेळी नवरदेवही शेवटी नवरीसोबत थिरकताना दिसत आहे. तसेच नवरदेवाची रिअॅक्शनही पाहण्यासारखी आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ love.ud.most या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान पूर्वी लग्न म्हटले की शुभ मुहूर्त, मानपान, लग्नातील विधी याकडे अधिक लक्ष दिले जायचे. परंतु, आताच्या लग्नांमध्ये लग्नातील वधू-वराच्या एन्ट्रीचे डान्स, भन्नाट उखाणे, फोटो, व्हिडीओ याकडे अधिक लक्ष दिले जात आहे.
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात.