
बहिणीच्या लग्नात डान्स करताना ती कोसळली आणि…
काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल, आनंदाचे वातावरण दु:खात बदलले, परिणीतीसोबत काय घडले?
विदिशा – मध्य प्रदेशातील विदिशामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका कॉन्सर्टमध्ये डान्स करताना अचानक एक तरुणी स्टेजवरच कोसळली. यातच तिचा मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
परिणीता जैन असे मृत तरुणी नाव आहे. मृत तरुणी आपल्या चुलत बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी विदिशा येथे आली होती. डान्स फ्लोअरवर नाचत असताना ती बेशुद्ध होऊन स्टेजवरच कोसळली. त्यामुळे सर्वांची धावपळ उडाली. लग्नसमारंभाला उपस्थित असलेल्या एका नातेवाईकाने, जो डॉक्टर होता, त्याने मुलीला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खुप उशीरा झाला होता. कोसळल्यानंतर लगेचच तिच मृत्यू झाला होता. घरच्यांनी सांगितले की, परिणीता तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाने खूप खूश होती. तिने एमबीएचे शिक्षण घेतले होते आणि सध्या ती खासगी नोकरी करत होती. घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला डान्सची आवड होती. जवळपास महिनाभरापासून ती लग्नाची तयारी करत होती. पण या अपघाताने सर्वांनाच धक्का बसला असून घरात आनंदाऐवजी शोककळा पसरली आहे. लग्न रविवारी होणार होते मात्र शनिवारीच लग्नाचे विधी आटोपून विवाह समारंभ उरकला गेला. परिणीताचा स्टेजवर डान्स करतानाच व्हिडिओ रविवार समोर आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गेल्या काही अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे परिणीतीला कोणताही आजार नव्हता. डान्स करत असताना मृत्यू झाल्याची ही काही पहिली घटना नाही. याआधीही अनेकवेळा नाचत असताना हार्ट अटॅक आल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत.