
मंडपात एंन्ट्री घेताना नवरीने असे काही केले की सगळे पाहतच राहिले
नवरीच्या एंन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल, नवरदेवाचे हावभाव बघाच!
पुणे – लग्न म्हणजे आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यात सध्या लग्नात वऱ्हाडी मंडळींसोबतच नवरा-नवरींनी डान्स करायचाही ट्रेन्ड आला आहे.
लग्न म्हणजे फक्त दोन जीवांचा मिलन नसून दोन कुटुंबांचं एकत्र येणं असंत. मात्र, गेल्या काही वर्षांत लग्नाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पारंपरिक विधींसोबतच आता लग्नात एंटरटेनमेंट, डान्स, रील्स, फोटोशूट आणि हटके एंट्री यांना तितकंच महत्त्व मिळत आहे. लग्नात नवरा-नवरीच्या एन्ट्रीच्या बाबतीत पूर्वीपेक्षा बरेच बदल झाले आहेत. आता नवरा नवरीचा हात पकडत किंवा नवरी लाजत मान खाली घालून चालत प्रवेश करत नाही. तर अलीकडे नवरीची एंट्री पाहण्यासारखी असते. व्हायरल व्हिडिओत नवरीने तिच्या मैत्रीणींसोबत लग्नात घोड्यावर बसून हलगीच्या तालावर ठेका धरत जबरदस्त अशी एन्ट्री घेतली आहे. नवरीनं केलेला डान्स सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होता.हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो शेअर केला जात आहे. सध्या लग्नात प्रत्येक इव्हेंटच अगदी स्पेशल असतो. तशीच खास तयारी केली जाते नवरा नवरीच्या लग्नमंडपात होणाऱ्या एन्ट्रीसाठी. हल्ली लग्न मंडपात वधूची एन्ट्री कशी असेल याकडे वऱ्हाडी मंडळीचं लक्ष लागून असतं. यासाठी काही विशेष व्यवस्थापन केलं जात आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर akashnaik011 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ खान्देश मधील असल्याचे बोलले जात आहे. अहिराणी भाषा देखील दिसून आली आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोकही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.