
पत्नीने लेकीसोबत मिळून पतीचा काढला काटा
दरोडा पडल्याने ह्रदयविकाराचा झटका आल्याचा बनाव कानामुळे फसला, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा, बाॅबीने असे का केले?
दिब्रुगड – अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे पत्नीने आपल्या मुलीसोबत मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या करुन त्याला नैसर्गिक मृत्यूचे रुप देण्याचा बनाव एका चुकीमुळे फसला आहे.
आसाममधील दिब्रूगडमध्ये व्यावसायिक उत्तम गोगोई उर्फ सांकई यांचा २५ जुलैला घरात मृतदेह आढळून आला होता. उत्तम गोगोई यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यासह त्यांच्या घरातून महागड्या वस्तू चोरीला गेल्या होत्या. दरोडा पडल्यानंतर त्यांचा अवस्थ वाटून ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचे पत्नी आणि मुलीने उत्तम गोगोई यांच्या भावाला आणि पोलिसांना. सांगितले होते. पण मृतदेहाचा कान कापल्याचे दिसून आल्यानंतर भावाला संशय आल्याने त्यांनी पोस्टमार्टम करण्याची मागणी केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा उत्तम गोगोई यांच्या पत्नी आणि मुलीचा कट उघडकीस आला. बॉबी गोगोई आणि मुलगी दोघांनीही उत्तम गोगोई यांना मारण्यासाठी दीपज्योती बुरागोहेन आणि गौरांग पात्रा या दोन लोकांना सुपारी दिली होती. दीपज्योती आणि पत्नी आणि मुलीसोबत जवळचे संबंध आहेत. आरोपींची ओळख बॉबी सोनोवाल गोगोई, तिची नववीत शिकणारी मुलगी आणि इतर दोन मुले अशी झाली आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण काय आहे, हे अद्याप उघड झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
दिब्रुगड पोलिसांनी बोरबरुआ परिसरात झालेल्या उत्तम गोगोई उर्फ सांकई यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी बॉबी गोगोई, मुलगी आणि इतर दोन तरुणांना अटक केली आहे. व्यापाऱ्याच्या घरातून सोन्याचे दागिने आणि इतर अनेक मौल्यवान वस्तूंची लूट झाली होती, ज्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.