Latest Marathi News
Ganesh J GIF

बायकोने नवरा आणि त्याच्या प्रेयसीची केली जोरदार धुलाई

बायकोचा रूद्रावतार पाहून घाबरली प्रेयसी, धुलाईचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, पतीचा मात्र धक्कादायक दावा

मेरठ – पती आणि पत्नीमधील नाते विश्वासावर अवलंबून असते. पण अलिकडच्या काळात विवाहबद्ध संबंध मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सध्या सोशल मिडीयावर एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात पतीची धुलाई झाली आहे.

उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात एका पत्नीने पती आणि पत्नीची जोरदार धुलाई केली आहे. मेरठ शहरात शहजाद आणि शायमा नावाचे जोडपे राहत होते. सुरूवातीला आनंदात गेल्यानंतर पतीचे बाहेर एका मुलीसोबत सुत जुळले. पतीत होणारा बदल पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने पतीवर लक्ष ठेवण्यास सुरु केले. शहजाद आपल्या प्रेयसीसोबत रामबाग काॅलनीत राहत होता. हे समजल्यानंतर शहजादची पत्नी शायमा आणि तिचे नातेवाईक रामबागमधील शहजादच्या घरी पोहोचले. घरात शहजादची प्रेयसीही असल्याचे समजल्यावर शायमाचा पारा चढला, संतापलेली शायमा काही वेळाने घरात घुसली आणि शहजादच्या प्रेयसीची धुलाई केली. शहजादने पत्नीला थांबवण्याचा प्रयत्नही केला पण शायमा इतकी संतापली होती की तिने पतीचीही धुलाई केली. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, पत्नी सायमाने सांगितले की, तिचे आणि तिच्या पतीचे २०१६ मध्ये प्रेमविवाह झाले होते. त्यांना दोन मुली आहेत, एक ८ वर्षांची आहे आणि दुसरी ४ वर्षांची आहे. तिचा पती अनेकदा त्याच्या प्रेयसीला सोडण्याबद्दल बोलत असे, पण आता तो तिच्यासोबत राहत आहे. शहजादने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याला यापुढे ना प्रेयसीसोबत रहायचे ना पत्नीसोबत कारण त्याला आता एकटे रहायचे असल्याचे सांगितले आहे.

 

या प्रकरणी सायमाने नौचंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या मैत्रिणीनेही तिला मारहाण केल्याचा तिचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!