वर्धा दि १० (प्रतिनिधी)- वर्ध्यामध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फाडणारी घटना समोर आली आहे. दारू पिणा-या पतीची हत्या केली. पण मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात अपयश आल्याने पोलीसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. अनिल मधुकर बेंदले असे मृत पतीचे नाव आहे तर मनीषा बेंदले असं आरोपी पत्नीचं नाव आहे.
वर्ध्यातील देवळी तालुक्यातील पुलगाव येथील हिंगणघाट फैल येथे बेंदले परिवार राहत होता. आरोपी पत्नी ही कराटे प्लेयर असून मृत पती हा आधी होमगार्ड मध्ये कार्यरत होता.पण दोन वर्षांपूर्वी आंदोलनादरम्यान तो निलंबित झाला होता. त्यानंतर त्याला दारूचे व्यसन लागले होते.त्यामुळे घरात वाद होत होते. त्याला वैतागून रात्री पत्नीने पतीची हत्या केली आणि नंतर मुलाच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे करून एका बॅगमध्ये भरण्यात आले.म्हाताऱ्या सासऱ्याने बॅगमध्ये काय आहे? असे विचारले असता जुने कपडे जाळायला आणले असे मनीषाने सांगितले.त्यानंतर मुलाच्या मदतीने ऑटोमधून पुलगाव वरून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मलकापूर बोधड या मूळ गावात नेऊन मृतदेहाचे तुकडे जाळण्यात आले. तर शीर हे पूलगाव रेल्वे परिसरात फेकण्यात आले. पण दोन दिवसानंतर शीर पोलिसांना आढळल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवीत खुनाचा उलघडा केला. त्यावेळी खुनामागे पत्नी असल्याचे समोर आल्यानंतर तिला अटक करण्यात आली.
पुलगाव पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला असून पत्नी मनीषा आणि मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी गोकुळसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, राजू हाडके, खुशाल राठोड, संजय पटले, पंकज टाकोने, महादेव सानप, शरद सानप यांनी केला पुढील तपास सुरु आहे.