Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रियकर आणि सरकारी नोकरीसाठी पत्नीने केली पतीची हत्या

हत्या करुन हार्ट अटॅकचा रचला बनाव, यामुळे शिवानीचे कारस्थान उघड, पोलिसही थक्क

बिजनोर- सरकारी नोकरी आणि प्रियकरासाठी पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बिजनोरमध्ये समोर आली आहे. सुरूवातीला पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव पत्नीने केला होता, पण अखेर हत्येचे धक्कादायक कारण समोर आले आहे.

दिपक कुमार असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे, तर शिवानी असे हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. जानेवारी २०२४ रोजी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा देखील आहे. दीपक रेल्वेमध्ये कामाला होता, त्याचा मृत्यू झाल्यानंतर नोकरी आपल्याला मिळेल. नंतर प्रियकरासोबत आयुष्य व्यवस्थित जगता येईल. त्यामुळे शिवानीने पती दीपकची हत्या करण्याचे ठरवले. घटनेच्या दिवशी शिवानीने आधी दीपकला जेवणात नशेचे पदार्थ मिसळून खाऊ घातले. जेव्हा दीपक बेशुद्ध झाला, तेव्हा तिने डाव्या हाताने त्याचा गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर शिवानीने पती दीपकला हार्ट अटॅक आल्याची माहिती सासू आणि दिराला दिली. सुरुवातीला तिने पतीला खासगी हॉस्पिटल आणि तिथून सार्वजनिक आरोग्य केंद्रात आणले गेले. जिथे डॉक्टरांनी त्यांना भरती केले नाही. बिजनौर जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये दीपकला मृत घोषित करण्यात आले. यावेळी दिपकच्या नातेवाईकांनी पोस्टमाॅर्टम करण्याचा निर्णय घेतला. पण शिवानीने त्यासाठी नकार दिला. पण दिपकच्या मानेजवळ खुणा आढळून आल्याने ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आणि त्यामुळे शिवाजीचे बिंग फुटले. दीपकच्या भावाने सांगितले की, शिवानी आणि तिच्या एका साथीदाराने मिळून माझ्या भावाची हत्या केली. दोघांचाही दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. तक्रारीवरून पोलिसांनी त्याची पत्नी शिवानी आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस शिवानीची अधिक चौकशी करत आहेत.

सासरच्यांनी सुनेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पत्नी आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि महिलेला ताब्यात घेसून चौकशी सुरू आहे. मेरठमधील साैरभ हत्याकांडासारखी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!