Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नानंतर १५ दिवसातच पत्नीने केली पतीची हत्या

आहेराच्या पैशातूनच पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी, कारण समोर आल्यावर पोलिसही थक्क?

लखनऊ- काही दिवसापूर्वी मेरठमधील साैरभ राजपूत हत्या प्रकरण चांगलेच गाजले होते. पण आता त्यापेक्षाही भयंकर घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसातच पत्नीने पतीची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पंधरा दिवसापूर्वी म्हणजे ५ मार्चला दिलीप यादवचे लग्न प्रगती यादव सोबत झाले होते. पण या लग्नामुळे प्रगती खुश नव्हती. तिचे अनुराग यादव याच्याशी मागील चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र तिचा प्रयिकर अनुराग यादव हा बेरोजगार होता, त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे तीने पैशांसाठी दिलीप यादव याच्यासोबत लग्न केलं. प्रगती यादवनं लग्नानंतर आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला, त्यासाठी तीने बघण्याच्या कार्यक्रमात तिला मिळालेल्या एक लाख रुपयांची सुपारी दिली. घटनेच्या दिवशी म्हणजे १९ मार्चला त्यांनी हत्येचा कट रचला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी औरेया जवळच्या एक युवक जखमी अवस्थेत सापडला. गेहूच्या शेतात तो गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. ग्रामस्थांनी लगेचच याची माहिती पोलिसांना कळवली. पोलिस घटनास्थळी पोहोचून त्यांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे त्यांची प्रकृती आणखी नाजूक झाल्याने त्यांना मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. पोलीसांनी शोध घेतला असता, अनुरागने त्याचा साथीदार रामजी नागरसोबत मिळून १९ मार्च रोजी प्रगतीचा पती कन्नोजहून परतत येत असताना हॉटेलजवळ थांबून त्याच्यावर गोळ्या झाडल्याचे निष्पण झाले. त्यांनी देखील गुन्हा कबूल केला आहे. त्यानंतर पोलीसांनी पत्नी प्रगती, प्रियकर अनुराग आणि त्यांचा साथीदार रामजी नागर यांना अटक केली आहे.

माझा विवाह दिलीपबरोबर जबरदस्तीने लावून दिला,’ असा प्रगतीचा दावा आहे. तर दुसरीकडे आम्हाला प्रगतीच्या प्रेम संबंधांबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. ती खोटं बोलतेय, असं प्रतिदावा प्रगतीच्या कुटुंबानं केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!