पतीची हत्या करणारी पत्नी न्यायालयात हजर, न्यायालयाचे हे निर्देश
तपासात अनेक बाबींचा उलगडा होणार, पती निखिलची हत्या करणाऱ्या आरोपी रेणुकाबाबत सासऱ्यांचा खळबळजनक दावा
पुणे दि २६(प्रतिनिधी)- दुबईला वाढदिवस साजरा केला नाही; तसेच लग्नाच्या वाढदिवसाला मनासारखी भेटवस्तू दिली नाही या कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली होती. या प्रकरणी पोलीसांनी त्या महिलेला अटकही केली होती. आता न्यायालयाने तिला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
वानवडीतील हत्येप्रकरणी रेणुका निखिल खन्ना हिला अटक करण्यात आली आहे. निखिल पुष्कराज खन्ना असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. निखिल आणि रेणुका यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. रेणुका मूळची राजस्थानची आहे. ती पतीला व्यवसायात मदत करत होती. सप्टेंबर महिन्यात रेणुकाचा वाढदिवस होता. तिला दुबईला वाढदिवस साजरा करण्याची इच्छा होती. मात्र, पती दुबईला घेऊन गेला नसल्याने ती रागावली होती. त्याचबरोबर रेणुकाला डिसेंबर महिन्यात भावाच्या मुलीच्या वाढदिवसासाठी दिल्लीला जायचे होते. या कारणावरून खन्ना दाम्पत्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. यानंतर रेणुकाला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने रेणुकाला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. निखिल खन्ना हे रिअल इस्टेटचे काम करत होते. त्याचे वानवडी येथे सिक्रेड वर्ल्ड नावाचे ऑफीस होते. तर त्यांची नानापेठ येथे सिटी वर्ल्ड नावाची स्कुल आहे. त्याची सर्व व्यवस्था त्यांची पत्नी म्हणजेच रेणुका खन्ना पाहत होती. रेणुकाला कोणत्याही गोष्टीचा लगेच राग येत होता अशी माहिती तिचे सासरे पुष्कराज यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे. दरम्यान या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करत आहेत. रेणुका आणि निखिल यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात रेणुकाने पती निखिल यांच्या तोंडावर ठोसा मारला होता. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.