
पतीला संपवण्यासाठी पत्नीचा प्रियकराच्या मदतीने मोठा कट पण…
प्रियकर पतीचा गळा दाबताना म्हणाली याला संपवून टाक, सोडू नको पण कुलरने डाव फसला, फरार प्रियकराचा वेगळाच दावा, सुनंदा गोत्यात
इंडी – कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील इंडी शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं स्वतःच्या पतीचा खून करण्याचा प्रयत्न केला. पण नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आहे. या धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बिरप्पा पुजारी असे हत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी पत्नी सुनंदा पुजारी हिला अटक करण्यात आली असून तिचा प्रियकर सिद्धप्पा कटनकेरी फरार आहे. बिरप्पा यांची पत्नी सुनंदा आणि सिद्धप्पा यांचे दीर्घकाळापासून अनैतिक संबंध होते. यापूर्वीही त्याने दोघांना फोनवर बोलताना पकडले होते. सिद्धप्पामुळेच त्यांच्या घरात वारंवार भांडणे होत होती.बिरप्पाने सांगितले की, १ सप्टेंबर रोजी ते घरात झोपले असता एक माणूस बिरप्पाच्या छातीवर बसला होता आणि त्याचा गळा दाबत होता. दुसरा जण त्याच्या पायावर बसून त्याच्यावर गुप्तांगावर हल्ला करत होता. स्वतः ला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत असताना त्याचा पाय कूलरवर आदळला आणि एक मोठा आवाज आला. पण तेंव्हा त्यांची पत्नी तिच्या प्रियकराला याला संपवून टाक, सोडू नकोस सिद्धू असे म्हणत प्रोत्साहन देत होती. कुलरचा आवाज झाल्याने घरमालक मल्लिकार्जुन सुतार आणि त्याची पत्नी राजेश्वरी यांनी आवाज ऐकला आणि ते घराबाहेर आले. त्यांनी बिरप्पाच्या घराचा दरवाजा वाजवला. त्यानंतर सुनंदा धावत बाहेर आली आणि घरमालकाला आत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण ते घरात आल्यामुळे सिद्धपा आणि त्याचा साथीदार पसार झाला, पण जाताना ठार मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात बिरप्पा गंभीर जखमी झाला असून त्याच्या मानेला आणि गुप्तांगांना दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पत्नी सुनंदा पुजारीला अटक केली आहे, तर तिचा प्रियकर सिद्धप्पा कटनकेरी फरार आहे.
सध्या सुनंदा पोलिसांच्या ताब्यात असून तिची कसून चौकशी सुरू आहे. फरार सिद्धप्पाने मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून आरोप फेटाळले. त्याने सांगितले की, “या कटामागे सुनंदाच मुख्य सूत्रधार आहे आणि मी निर्दोष आहे. जर माझा मृत्यू झाला तर त्याला फक्त सुनंदाच जबाबदार असेल,” असे त्याने स्पष्ट केले आहे.