
पुणे – पत्नी विवाहबाह्य संबंध सोडायला तयार नाही, प्रियकराने जीवे मारण्याची दिलेली धमकी, याला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सोपान धोंडिराम केंद्रे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची आई रंभाबाई धोंडिराम केंद्रे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोपानची पत्नी भाग्यश्री आणि तिचा प्रियकर मधुकर अंबाजी केंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ एप्रिल २०२४ रोजी लोणीकंदमध्ये घडला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा सोपान व भाग्यश्री यांचे लग्न २०१६ मध्ये झाले होते. लग्नानंतरही सून भाग्यश्री हिचे मधुकर केंद्रे याच्याबरोबर विवाहबाह्य प्रेमसंबंध होते.
सोपान हा तिला लग्नाबाहेरील संबंध सोडण्याबाबत वारंवार सांगायचा प्रयत्न करायचा. परंतु, ती त्यास तयार नव्हती. मधुकर केंद्रे याने सोपान याला तू भाग्यश्रीला सोडून दे, मी तिला संभाळतो़ तू आमच्यामध्ये येऊ नको, नाय तर तुला सोडणार नाही़ अशी धमकी दिली होती. त्यामुळे मधुकर केंद्रे व पत्नी यांच्याकडून होणार्या त्रासाला कंटाळून सोपान केंद्रे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करीत आहेत.