
या प्रसिद्ध अभिनेत्रीची २०० कोटी घोटाळा प्रकरणी कारवाई होणार?
अभिनेत्रीची सर्वोच्च न्यायालयाचा धाव, अटकेची कारवाई होण्याची शक्यता, कथित प्रियकारामुळे अभिनेत्री अडचणीत
मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने सर्वोच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्यासाठी आणि तिच्याविरुद्ध सुरू असलेल्या फौजदारी कारवाईसाठी याचिका दाखल केली आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित ही याचिका आहे.
जॅकलिनने दिल्ली उच्च न्यायालयात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती आणि आरोपपत्राची दखल घेण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. पण, ३ जुलै रोजी उच्च न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने जॅकलिनचे नाव आरोपी म्हणून ठेवले आहे. न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिनने त्याच्या गुन्हेगारी कारवायांबद्दल माहिती असूनही त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू आणि दागिने स्वीकारल्याचे म्हटले आहे. जॅकलिनने न्यायालयात आपली बाजू मांडताना म्हटले आहे की तिच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत आणि तिला सुकेशच्या गुन्हेगारी इतिहासाची कोणतीही माहिती नव्हती. त्यांनी सांगितले की जॅकलिनला मनी लाँड्रिंग किंवा फसवणुकीत कोणताही सहभाग नसतानाही या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. अभिनेत्री म्हणते की तिला या प्रकरणातून बाहेर पडायचे आहे आणि तिची प्रतिमा स्वच्छ करायची आहे, जेणेकरून तिच्या कारकिर्दीवर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होऊ नये. सुकेश चंद्रशेखरवर प्रसिद्ध उद्योगपती, राजकारणी आणि सेलिब्रिटींना फसवल्याचा आरोप आहे. सुकेशने जॅकलीनला महागड्या कार, दागिने आणि डिझायनर ब्रँडसह कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. या भेटवस्तूंमुळे जॅकलीनचे नाव या प्रकरणाशी जोडले गेले आणि तिच्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मागील महिन्यात जॅकलिंनचा वाढदिवस होत्या त्यादिवशी देखील सुकेशने २५ कोटी रुपयांचे दान केले होते. हे पैसे त्याने मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिले आहेत. जॅकलिन फर्नांडिस ही सुकेशला डेट करत होती, असा दावा त्याच्या वकिलाने कोर्टात केला होता. परंतु तिने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.