अंबादास दानवे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार?
सुषमा अंधारेमुळे ठाकरे गटात बेबनाव, शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट
छ. संभाजीनगर दि २६(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे गटाचे नते तथा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामध्ये ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर अनेक आमदार आणि खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. पण विधान परिषदेतील आमदार मात्र ठाकरे गटासोबत आहेत. पण आता ठाकरेंच्या विश्वासातील विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी हा दावा केला आहे. शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे माझ्या संपर्कात आहेत. त्यांचा मला कॉल आला होता. केव्हाही काही होऊ शकते” असा दावा त्यांनी केला त्याचबरोबर आमच्या मागे गर्दी नाही तरी इथे इतके लोक कसे जमले. उद्धव ठाकरे यांनी एका शब्दानेही ओवैसी यांचा निषेध केला नाही, अशी घणाघाती टीकाही संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यामुळे आता शिरसाट यांच्या या गौप्यस्फोटावर अंबादास दानवे काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. लवकरच शिरसाट यांच्या गौप्यस्फोटनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंबाबत मोठा गाैप्यस्फोट केला आहे. अंबादास दानवे यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत आपल्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी सुषमा अंधारेंवर टीका करताना जीभही घसरली. ती बाई सर्वांना म्हणते हे माझे भाऊ आहेत. सत्तार माझे भाऊ, भुमरे माझे भाऊ, काय काय लफडे केले तिने काय माहित, असे वक्तव्य त्यांनी केले.