Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्रात निवडणूक तारखांची घोषणा होणार ? कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार ? आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन

महाराष्ट्रात निवडणूक तारखांची घोषणा होणार आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूक कार्यक्रम घोषित करतील, अशी माहिती आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता असून त्यानंतर ग्रामपंचायत आणि इतर निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने निवडणूक आयोगाच्या आधीच जाहीर तारखा जाहीर केल्या आहेत.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. लवकरच निववडणूकांच्या तारखा जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मतदार यादीत अनियमितता असल्याचा आरोप करत काही राजकीय पक्षांनी ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोग 5 किंवा 6 नोव्हेंबर रोजी अधिकृत घोषणा करण्याची अपेक्षा आहे अशी देखील माहिती समोर आली होती. राज्य निवडणुका तीन टप्प्यात होतील. यावेळी, आणखी विलंब होण्याची शक्यता नाही.

महाराष्ट्रात एकूण 858 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत . यामध्ये 29 महानगरपालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 248 नगर परिषदा आणि 336 पंचायत समित्यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारी २०२६ पूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश आधीच दिले आहेत. या आदेशानंतर, निवडणूक आयोगावर कोणत्याही प्रकारे निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ नयेत यासाठी दबाव वाढला आहे. म्हणूनच आयोग आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात औपचारिक घोषणा करण्याची योजना आखत आहे.

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याने संभाव्य निवडणुकीच्या तारखा जाहीर करून वाद निर्माण केला आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आगामी जिल्हा परिषदा, नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. 5 नोव्हेंबर ला नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक जाहिर होतील तर 15 डिसेंबरला जिल्हा परिषद,पंचायत समिती मतदान होईल आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका सुरु असताना महानगरपालिकांच्या निवडणूका जाहिर होऊन 15 जानेवारी मतदान होईल आणि 31 जानेवारी सर्व निवडणुका पूर्ण होतील असा दावा वळसे पाटलांनी केला आहे. निवडणूकीच्या तारखा जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे मात्र आमच्याकडील माहितीनूसार या तारखा असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात. मात्र त्यांच्या या दाव्यामुळे त्यांना निवडणुकीच्या तारखा कोणी सांगीतल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून आज (४ नोव्हेंबर २०२५) दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम घोषित करतील. निवडणूक आयोग ५ किंवा ६ नोव्हेंबर रोजी अधिकृत घोषणा करण्याची अपेक्षा आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहे. राज्य निवडणुका तीन टप्प्यात होतील. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, त्यानंतर ग्रामपंचायत आणि इतर निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात एकूण ८५८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ४२ नगर पंचायती, २४८ नगर परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांचा समावेश आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!