
अपहरण आणि मारहाण प्रकरणी या अभिनेत्रीला अटक?
अभिनेत्रीचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल, पोलीस कारवाई आधी अभिनेत्री फरार?
चेन्नई – मल्याळम अभिनेत्री लक्ष्मी मेननवर आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुणाने मारहाणीचा प्रयत्न आणि अपहरण यासंदर्भातले आरोप केले आहेत. अभिनेत्री लक्ष्मी मेनन सध्या फरार आहे. यामुळे अभिनेत्रीला अटक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण अभिनेत्री लक्ष्मी मेनन सध्या फरार असल्याचे बोलले जात आहे.
एर्नाकुलम उत्तर पोलिसांनी आयटी कर्मचाऱ्याच्या अपहरण आणि मारहाण प्रकरणात अभिनेत्री लक्ष्मी मेनन आणि तिच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अलुवा येथील रहिवासी असलेल्या पीडितेने पोलिसांना सांगितले की तो त्याच्या मित्रांसह कोची येथील एका रेस्टोबारमध्ये गेला होता. तेथे अभिनेत्रीच्या मित्रांशी एका गोष्टीवरून वाद झाला. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून तो लगेचच त्याच्या मित्रांसह तिथून निघून गेला. परंतु यानंतर त्याचे अपहरण करण्यात आले आणि त्याला मारहाणही करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गाडीत बसवल्यानंतर, आरोपी तरुणाला धमकावत राहिला आणि मारहाण करत राहिला. यादरम्यान, त्याला शिवीगाळ करण्यात आली आणि त्याचा फोनही हिसकावून घेण्यात आला. सुमारे एक तास त्याला बंदिस्त ठेवल्यानंतर, त्याला परवूरमधील वेदिमारा जंक्शनवर फेकून देण्यात आले. दरम्यान पहरण आणि मारहाणीच्या आरोपांना सामोरे जात असलेल्या दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मी मेननला केरळ उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने सध्या ओणमच्या सुट्टीपर्यंत अभिनेत्रीच्या अटकेला स्थगिती दिली आहे. ओणमच्या सुट्टीनंतर न्यायालय अभिनेत्रीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सविस्तर सुनावणी करणार आहे. दरम्यान, पोलिसांनी एक व्हिडिओ मिळवला आहे. या व्हिडिओमध्ये लक्ष्मी मेनन एका गाडीला थांबवताना स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओमुळे तिच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले आहेत.
केरळमधील कोचीची रहिवासी असलेल्या लक्ष्मी मेननने २०११ साली ‘रघुविंथे स्वांथम रजिया’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले. त्यानंतर २०१२ मध्ये ‘सुंदर पांडियन’ या तामिळ चित्रपटातून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. तिने आतापर्यंत १९ हून अधिक मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.