
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला ‘या’ प्रकरणी अटक होणार?
ईडीने बजावली नोटीस,'या' उत्पादनची जाहीरात केल्यामुळे अडचणी वाढल्या, 'हे' प्रसिद्ध सेलिब्रेटी रडारवर?
चेन्नई – तेलुगू चित्रपटसृष्टीतील २९ सेलिब्रिटी, युट्यूबर आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरवर बेकायदेशीर बेटिंग ॲप्सचा प्रचार केल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या यादीत अभिनेता विजय देवेराकोंडा, राणा दग्गुबाती, मंचू लक्ष्मी, प्रकाश राज, निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला, प्रणिता सुभाष, अँकर श्रीमुखी, श्यामला, युट्यूबर हर्षा साई, बया सनी यादव यांचा समावेश आहे. मियापूर येथील ३२ वर्षीय व्यापारी फणींद्र शर्मा यांनी तक्रार दाखल केली, तेव्हा हा खटला सुरू झाला. सायबराबाद पोलिसांनी २५ सेलिब्रिटींविरुद्ध १९ मार्च २०२५ रोजी एफआयआर दाखल केला होता. ज्यामध्ये आयपीसी, तेलंगणा गेमिंग कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक तरुण आणि सामान्य लोकांनी प्रसिद्ध चित्रपट कलाकारांकडून प्रमोट केल्या जाणाऱ्या या बेटिंग ॲप्समध्ये पैसे गुंतवत असल्याची माहिती समोर आली. तक्रारीनुसार, हे ॲप्स मध्यम आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक संकटात टाकत आहेत. येत्या काही दिवसांत ईडी त्यापैकी काहींचे जबाब नोंदवू शकते. दरम्यान, अधिकारी अधिक एफआयआर गोळा करत आहेत आणि या बेटिंग प्लॅटफॉर्म्सनी फसवलेल्या आणखी तक्रारदारांचा शोध घेत आहेत. या प्लॅटफॉर्म्समधून एकूण किती कमाई झाली आणि प्रत्येक सेलिब्रिटीची भूमिका काय होती हे शोधण्यासाठी सध्या मोठी चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांचे जबाब नोंदवल्यानंतरच त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. अधिकाऱ्यांना असा संशय आहे की या प्रचारात्मक उपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे हस्तांतरित केले गेले आहेत, ज्यामध्ये मनी लाँडरिंगचा समावेश असू शकतो. दरम्यान, ईडीच्या चौकशीमुळे या सेलिब्रिटींवर दंड आणि कायदेशीर कारवाईचा धोका आहे.
विजय देवेराकोंडाच्या टीमने स्पष्ट केले की, त्याने फक्त स्कील आधारित गेमिंग प्लॅटफॉर्म ए२३ चे प्रमोशन केले होते. प्रकाश राज म्हणाले की, त्यांनी २०१६ मध्ये एका अॅपचे प्रमोशन केले होते, परंतु त्यापुढे कधीही अशाप्रकारचे प्रमोशन केले नाही.