
एसटी चालक आणि वाहकाला महिलेची चपलेने मारहाण
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल, या कारणामुळे संतापलेल्या महिलेची कृत्य, कारवाईची मागणी
कोल्हापूर – एसटी चालक आणि वाहक यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. कारण अनेकावेळा एसटी चालक आणि वाहकांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. आता कोल्हापूर येथील कर्नाळा येथे एका महिलेने एसटी चालक आणि वाहकाला मारहाण केली आहे.
कर्नाळा परिसरात नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, एका महिलेने एसटी बस चालक आणि वाहकाला चपलांनी जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यात एका महिला एसटी चालक आणि वाहकाला चपलेने बेदम मारहाण केली आहे. यात ती महिला त्यांच्याबद्दल अपशब्द देखील वापरत आहे. हा सर्व प्रकार होत असताना स्थानकातील एकही सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणात संबंधित चालकाने अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये आपसात तडजोड करत तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांनीही कोणतीही कारवाई केली नाही. पण विविध एसटी संघटनांनी हल्ल्यावर चिंता व्यक्त केली आहे. कारण अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे.
एसटी बरोबरच मुंबईतील बेस्ट आणि पुण्यातील पीएमटी या ठिकाणीही चालक आणि वाहक यांच्यावर अनेकवेळा हल्ला करण्यात आला आहे. त्यातून अनेकदा मारहाण देखील करण्यात आली आहे. त्यामुळे हा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो.