Latest Marathi News
Ganesh J GIF

पतीला मारून ड्रममध्ये भरणारी साधी महिला होती, माझी बायको तर अधिकारी

पतीचे डीएसपी असलेल्या पत्नीवर गंभीर आरोप, जबरदस्तीने लग्न केल्याचाही दावा, लेडी डीएसपी वादात?

आराहा – महिला डीएसपी श्रेष्ठा ठाकूर आणि त्यांचे पती रोहित सिंह यांच्या घटस्फोट प्रकरणात एक नवीन गोष्ट समोर आली आहे. पती रोहितने श्रेष्ठा ठाकूरवर गंभीर आरोप करत आपलीही अवस्था मेरठसारखी होईल अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे घटस्फोट प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

रोहितने श्रेष्ठा ठाकूरवर मोठे आणि गंभीर आरोप केले आहेत. तो म्हणाला, आमची ओळख एका मॅट्रोमनी साईटवर झाली. आम्ही दोघांनी जवळपास दोन महिने गप्पा मारल्या, मग आम्ही भेटलो, यानंतर माझा नंबर शेअर केला. त्यानंतर आम्ही लखनौला भेटण्याचा प्लॅन बनवला. त्यानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये आम्ही लखनऊच्या एका हॉटेलमध्ये भेटलो. आम्ही एकाच खोलीत रात्र काढली. रोहित पुढे म्हणाले की, ‘सकाळ होताच श्रेष्ठाने लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. ९ ऑगस्ट २०१७ रोजी लखनौच्या हजरतगंज (गंजपार) येथील हनुमान मंदिरात आमचे लग्न झाले. यानंतर आमच्या दोन्ही कुटुंबांनी मान्यता दिल्यानंतर दहा महिन्यांनी म्हणजे १६ जुलै २०१८ रोजी सर्वांच्या साक्षीने लग्न केले. त्याचबरोबर तुम्ही लोकांनी पाहिले असेल की एका महिलेने तिच्या नवऱ्याला मारले, त्याला ड्रममध्ये भरले आणि त्यात सिमेंट भरले, ती एक सामान्य महिला होती, माझी पत्नी एक अधिकारी आहे, असे म्हणत आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगितले आहे. रोहितने असेही सांगितले आहे की, आपण कोचिंग क्लास चालवतो मी कोणताही अधिकारी नाही, तरीही श्रेष्ठा आपण आयकरचा सहाय्यक आयुक्त असल्याचे खोटे सांगितले. नंतर तिनेच आपल्यावर फसवणूकीची केस केली, असा आरोप केला आहे. तसेच रोहितने सासु आणि मेव्हणा आणि मेव्हणीवरही आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान दोघांनाही एक मुलगा असून तो सध्या श्रेष्ठा यांच्याकडे असतो. या प्रकरणी पुढील सुनावणी उद्या ७ एप्रिलला होणार आहे.

श्रेष्ठा ठाकुर या सध्या उत्तर प्रदेश पोलिसात उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्या २०१२ बॅचच्या पीपीएस अधिकारी आहेत. सध्या त्या शामली येथे कार्यरत आहेत. उपअधीक्षक यांना उत्तर प्रदेशमध्ये लेडी सिंघम या नावाने ओळखले जाते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!