Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

व्हाईस रेकाॅर्डिंगमुळे झाला उलगडा, वर्गमित्रच द्यायचा त्रास, तरुणींने उचलले टोकाचे पाऊल

पुणे – पुण्यात इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या तरुणीने १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ताथवडे येथे ५ जानेवारी २०२५ रोजी ही घटना घडली होती. प्रेम प्रकरणातून तिने ही आत्महत्या केली आहे.

सहिती कलुगोटाला रेड्डी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. याप्रकरणी सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव राजेंद्र डोंगरे याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहिती हिने ५ जानेवारी रोजी राहत्या इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सुरुवातीला पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, सहिती हिचे मित्र-मैत्रिणी फिर्यादी कलुगोटाला रेड्डी यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी सहिती हिने मृत्युपूर्वी तिच्या मोबाईल वरून मैत्रिणीला मोबाईलचा पासवर्ड आणि सोसायटीमधील मित्राचा नंबर शेअर केला असल्याचे सांगितले. त्यानुसार कुटुंबीयांनी सहितीचा मोबाईल फोन अनलॉक केला. त्यामध्ये सहितीने मित्र प्रणव, आई-वडील आणि इतर मित्रांसाठी असे तीन व्हॉइस रेकॉर्डिंग करून ठेवले होते. सहिती आणि तिचा वर्गमित्र प्रणव यांचे प्रेमसंबंध होते. सहितीच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन प्रणव तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी प्रणव डोंगरे याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!