
किरकोळ कारणावरून तरूणाचा मैत्रीणीवर अत्याचार
अत्याचाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, आरोपीला अटक, मैत्रीण रडत होती पण तो....
दिल्ली – किरकोळ कारणावरून एका तरूणाने आपल्या मैत्रीण तरुणीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या तरूणाचा मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
दिल्लीतील ग्रेटर नोएडा वेस्टच्या गौर सिटी-२ येथील आम्रपाली गोल्फ होम्स सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका तरुणाने फ्लॅटच्या बाल्कनीत आपल्या गर्लफ्रेंडला बेदम मारहाण केली आहे. तरुण इक्बाल आणि त्याची मैत्रीण घरात गेम खेळत होते. पण त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या तरूणीने त्याचा मोबाईल फेकला. यामुळे युवक जास्तच संतापला. पण तरुणी त्याच्यापासून वाचण्यासाठी बाल्कनीत आली, पण तरूणीने तिथे पोहोचला, आणि बेदम मारहाण चालू केली. यावेळी तरूणीने सोडण्याची विनंती करूनही मारहाण चालूच ठेवली. ही संपूर्ण घटना समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. जी आता व्हायरल होत आहे. तरुणीनेही पोलिसात तक्रार दाखल केली असून, आरोपीला अटक केली आहे.
व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. ही घटना ३० म्हणजे काल घडली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात इतर कायदेशीर कारवाई देखील केली जात आहे.