Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने तरुणाची आत्महत्या

आत्महत्येपुर्वी व्हिडिओ पोस्ट करत मागितली आई वडिलांची माफी, मित्रांना सल्ला, म्हणाला, ती माझं खरं प्रेम विसरली...

जळगाव – प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने अमळनेर तालुक्यातील गांधली गावातील तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. इंस्टाग्राम वर व्हिडीओ पोस्ट करत तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या पूर्वी instagram वर त्याने व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

गौरव बोरसे असं या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये गौरवने सांगितले की, तो गेली चार वर्षे एका तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघांनी घरच्यांच्या नकळत लग्नदेखील केले होते. मात्र, आता त्या तरुणीने लग्नास नकार दिला आणि त्याच्यावर संपूर्ण नातं विसरण्याचा आग्रह धरला. याच भावनिक आघाताने गौरवने हा टोकाचा निर्णय घेतला. गौरवने आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये म्हटलंय, ‘चार वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तू मला कसं विसरू शकतेस? आई, माझ्या मृत्यूनंतर खूप रडू नकोस. मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही. माझे वडील खूप गरीब आहेत, त्यांना त्रास देऊ नको. त्यांना पण सांग. त्याचबरोबर माझ्याकडून काही चुकलं असेल, तर मला माफ करा.’ या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर गौरवचा व्हिडिओ पाहून अनेकजण भावनिक झाले आहेत. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

 

एका क्षुल्लक प्रेमभंगाच्या अनुभवामुळे तरुणाने आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व शोककळा पसरली आहे. प्रेमात माणूस उभारी घेतो, पण याच प्रेमामुळे गाैरवने टोकाचा निर्णय घेतल्याने याची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!