Latest Marathi News
Ganesh J GIF

तरुणाची विवाहित प्रेयसीसोबत विष पिऊन आत्महत्या

प्रेयसीच्या मुलाच्या हत्येमुळे जन्मठेपेची शिक्षा, 'लिव्ह इन रिलेशनशिप'चा भयंकर शेवट, कारण काय?

पैठण – जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या प्रियकराने कारागृहात जाण्यापूर्वीच विवाहित प्रेयसीसोबत टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यात घडली आहे. दोघांनीही विष पिऊन आत्महत्या केली आहे.

नवनाथ शामराव जगधने आणि शीतल दोडवे-उघडे अशी मृतांची नावे आहेत. पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कातपूर येथील नवनाथ शामराव जगधने आणि शितल दोडवे-उघडे हे दोघे पाच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नवनाथ शामराव जगधने याच्यावर अंबड (जि. जालना) येथील पोलिस स्टेशन येथे ६ वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून, तो कारागृहात शिक्षा भोगत होता. सध्या तो एक महिन्याच्या पॅरेल सुट्टीवर आला होता. त्याला २८ मार्चला पुन्हा शिक्षा भोगण्यासाठी जाण्यासाठी जायचे होते. नवनाथ जगधने हा शुक्रवारी सायंकाळी विहिरीत उडी मारण्यासाठी गेला होता. त्यावेळी नातेवाईकांनी समजूत घालून त्याला घरी परत आणले होते. त्यानंतर शनिवारी रात्री घराच्या छतावर झोपला असता त्याने विषारी औषध प्राशन केले आणि तेथून निघून गेला. गावाजवळील मक्याच्या शेतात सोमवारी (ता. 31) त्याचा मृतदेह आढळून आला. शितलचे लग्न दुसरीकडे झाले असताना तिचे नवनाथ बरोबर प्रेमसंबंध होते. नवनाथ तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला असताना तिच्या ६ वर्षीय मुलाचा खून त्यांनी केला होता. याप्रकरणी नवनाथ शिक्षा भोगत होता. संभाजीनगर येथे ती भाड्याने राहत होती. काही दिवसांपूर्वी कातपुर येथे ती आली होती. सोमवारी दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह पैठण येथील शासकीय रूग्णालयात पाठवले.

या प्रेमी युगुलाने आत्महत्या का केली हे समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!