
हाॅटेलचे बील पाहताच तरूणाचा हार्ट अटॅकने मृत्यू
तरूणाच्या मृत्यूचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, तरुणाबरोबर नेमकं काय घडलं?
जयपूर – देशात अनेक वर्षांपासून हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात तरुणांची संख्या मोठी आहे. आता अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. यात हाॅटेलचे बील पाहून एका तरूणाचा मृत्यू झाला आहे.
राजस्थानमधील राजसमंद येथे घडली आहे, जिथे एका हॉटेलमध्ये एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. तरुणाचा दुर्दैवी मृत्यू रेस्टॉरंटमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरुणाला हॉटेलमध्ये जेवण करुन बील देताना हार्ट अटॅक आल्याचे दिसत असून या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. सचिन कुमार असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर सचिन कुमार हा बिल देण्याासाठी काऊंटरजवळ पोहोचला. सचिन कुमार हॉटेलच्या रिसेप्शनवर बिल भरण्यासाठी उभा असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो जमिनीवर पडला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. व्हिडिओत दिसत आहे की, तरुण रेस्टॉरंटमध्ये बिल भरण्यासाठी कॅश काउंटरवर उभा आहे. कॅश काउंटरवर असलेल्या बडीशेपच्या भांड्यातून तो एक चमचा बडीशेप उचलतो आणि खाऊ लागतो. कॅशियर त्याला बिल देतो. बिल बघताच क्षणी तो कॅश काउंटरवरच कोसळतो. तो तसाच जमिनीवर पडतो आणि जागीच मरण पावतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून अशा प्रकारच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मृत्यू कधीही आणि कसाही येऊ शकतो, हेच हा व्हिडिओ पाहून दिसत आहे.