Latest Marathi News
Ganesh J GIF

धर्म बदलण्यासाठी छळ केल्याने तरुणीची आत्महत्या

धर्मांतरासाठी प्रियकर आणि कुटुंबीयाकडून शारिरिक व मानसिक अत्याचार, रमीजच्या जाचामुळे सोनाने जीव दिला

केरळ – केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लग्न करण्यासाठी प्रियकराने धर्म बदलण्यासाठी बळजबरी केल्यामुळे आत्महत्या केली आहे.

मृत तरुणीचं नाव सोना एल्डोज असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तिचा प्रियकर रमीज याला अटक केली आहे. सोनाच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. या नोटमध्ये तिने प्रियकर रमीज आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. सोना आणि रमीज कॉलेजमध्ये सोबत होते आणि त्यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. रमीजने सोनासोबत लग्न करण्याचे वचन दिले होते. पण त्यासाठी तिने आपला ख्रिश्चन धर्म बदलून त्याच्या मुस्लीम धर्माचा स्वीकार करावा अशी अट घातली. सोनाने याला विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या रमीज आणि त्याच्या कुटुंबीयांनी सोनावर धर्मांतरासाठी प्रचंड दबाव आणला. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. अखेर या सततच्या छळाला कंटाळून तिने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. सुसाइड नोटमध्ये सोनाने लिहिले आहे की, रमीजने तिला लग्नाचे आमिष दाखवून फसवले. तसेच, त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती केली. तिने धर्मांतरास नकार दिल्यावर तिला मारहाण करण्यात आली आणि एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले. या मानसिक आणि शारीरिक छळाचा उल्लेख तिने पत्रात केला आहे. पोलिसांना तिच्या आणि रमीजच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्येही या छळाचे पुरावे आढळले आहेत. या घटनेनंतर समाजात संतापाची लाट पसरली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे रमीजला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, लैंगिक शोषण आणि शारीरिक छळ करणे अशा अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमीजच्या कुटुंबीयांचाही यात सहभाग असल्याने त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!