Latest Marathi News
Ganesh J GIF

तरुणीने २१ व्या वर्षी सरकारी अधिकारी होत केला विक्रम

आयएएस पद मिळवत अनेकांना केले थक्क, ना क्लास ना ट्युशन, कोण आहे आस्था?

दिल्ली – सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण सगळ्यांची स्वप्ने पूर्ण होतातच असे नाही. पण नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी निकालात अवघ्या २१ वर्षाच्या तरुणीने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत देशात ६१ वा क्रमांक पटकावला आहे.

काही दिवसांपूर्वी यूपीएससी २०२४ चा निकाल जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले. या परीक्षेत आस्था सिंहने ६१ रँक प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे आस्थाने वयाच्या फक्त २१ व्या वर्षी एवढ मोठं यश मिळवलं आहे. आस्था सिंह या पंजाबच्या जीरकपूर येथील रहिवासी असून, त्यांचं बालपण भोपाळ आणि पंचकुला येथे गेलं. त्यांनी दिल्ली विद्यापीठातील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स येथून इकोनॉमिक्समध्ये पदवी पूर्ण केली. युपीएससी आधीही आस्था सिंहने हरियाणा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत असिस्टंट एक्साइज अँड टॅक्सेशन ऑफिसर म्हणून ट्रेनिंग सुरू केली होती. पण आता तिने मोठे यश मिळवत केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. आस्थाने कोणत्याही क्लासेसशिवाय हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचे संपूर्ण देशभरात कौतुक होत आहे.

आस्था सिंह मूळची उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील कुशहां कनौरा गावातील पण नोकरीनिमित्त त्यांचे कुटुंबीय हरियाणात स्थालांतरीत झाले होते. तिचे यश अनेकांसाठी प्रेरणा देणारे आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!