
बायकोशी भांडण करणाऱ्या तरुणीची नवऱ्याने केली हत्या
तरुणीच्या हत्येने नंदुरबार जिल्हा हादरला, आदिवासी समाज आक्रमक, पोलीस अलर्टवर
नंदुरबार – दोन महिलांमध्ये आणि विशेषकरून शेजारच्यांमध्ये कधी ना कधी तरी वस्तू होतातच. पण नंदुरबारमध्ये एका पतीने बायकोशी वाद घालणाऱ्या महिलेची निर्घुण हत्या केली आहे.
दिपाली चित्ते असे मृत झालेल्या आदिवासी तरुणीचे नाव आहे. रिज्जु मुस्लीम कुरेशी आणि मुस्लिम हमीद कुरेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ डिसेंबरला रात्री ८ च्या सुमारास नंदुरबारच्या मलोणी परीसरात दोन महिलांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. भांडणानंतर दिपाली आणि तिचे नातेवाईक रिज्जूच्या घरी गेले. दोन्ही गटात पुन्हा वाद झाला यावेळी रिज्जूच्या पतीला राग अनावर झाला आणि त्याने चाकू काढत दिपालीवर वार केला. यानंतर दिपालीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर दोन संशयित आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
तरुणीच्या मृत्युनंतर जिल्ह्यात मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. या प्रकरणानंतर आक्रमक आदिवासी समाजाने शहादा बंदची हाक दिली आहे. यासोबत शहादा शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.