Latest Marathi News
Ganesh J GIF

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्युबर तरुणीला अटक

युट्युबर बनली पाकिस्तानी हेर, समोर आली धक्कादायक माहिती, कोणी आहे पाकची हेर ज्योती मल्होत्रा?

दिल्ली – ऑपरेशन सिंदूरमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढलेला आहे. आता त्यातच देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिला गुप्तचरयंत्रणांकडून अटक करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर असलेल्या ज्योती मल्होत्रा हिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ज्योती ‘ट्रॅव्हल विथ ज्यो’ नावाचा युट्युब चॅनेल चालवते. ती पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली असताना ती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या संपर्कात आली. या प्रकरणात आतापर्यंत पंजाब आणि हरयाणाच्या विविध भागात राहणाऱ्या एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा प्राप्त करून २०२३ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. या दरम्यान, तिची भेट पाकिस्तानच्या उच्चायोगातील कर्मचारी एसहास-उर-रहीम उर्फ दानिश याच्याशी झाली. त्यानंतर त्यांच्यातील संबंध अधिकच घनिष्ट होत गेले. दानिशच्या माध्यमातून ज्योती हिची ओळख पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांमधील इतर एजंट्ससोबत झाली. ज्यामध्ये अली अहसान आणि शाकिर ऊर्फ राणा शहबाज यांचाही समावेश होता. ज्योती या एजंट्ससोबत व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यासारथ्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्कात राहायची. ती पाकिस्तानबाबत सोशल मीडियावरून सकारात्मक माहिती शेअर करायची, सोबतच तिने काही संवेदनशील माहितीसुद्धा पाकिस्तानी एजंट्सना दिली. ज्योतीने आपल्या इंस्टाग्रामवर पाकिस्तानशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि रिल्स शेअर केल्या आहेत. ज्योतीने आपल्या एका व्लॉगमध्ये केवळ चांगल्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे एका परदेशी एजंट्सकडून ज्योतीवर गुप्तहेर असण्याचा आरोप केला आहे. ज्योतीवर पाकिस्तानबाबत सकारात्मक माहिती देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. सध्या ज्योती मल्होत्रा हिची सखोल चौकशी करण्यात येत असून तिच्यासोबत आणखी मोठे रॅकेट आहे का? याबाबतचा तपास सुरु आहे. याशिवाय हरियाणा पोलिसांनी आतापर्यंत आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागात राहणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. त्यामुळे आगामी काळात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

ज्योती मल्होत्रावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट, १९२३ च्या कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योतीचा लेखी जबाब घेतल्यानंतर हे प्रकरण हिसारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे. तिची सध्या सखोल चौकशी केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!