Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे पोलिसांनी गाडी उचलल्याने तरुणाचे रस्त्यावर झोपून आंदोलन

तरूणाच्या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांनी अशी घडवली अद्दल, काय घडले?

आळंदी – रस्त्यावर अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांवर कारवाई करण्याची मोहिम पुणे पोलीसांकडून राबवली जाते. त्यावेळी अनेक वादाच्या घटना घडत असतात. त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. पण आळंदीत मात्र एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

देहू फाट्याजवळील काळे कॉलनीसमोर आज पोलिसांनी दुचाकी वाहनांवर कारवाई केली. रस्त्यालगत अवैद्य पार्किंग केलेल्या दुचाकींना टोईंग व्हॅनमध्ये उचलून नेण्यात येत होते. त्यावेळी एका तरुणाचीही दुचाकी उचलण्यात आली. त्यामुळे तो तरूण पळत आला आणि गाडी सोडण्याची मागणी केली. पण पोलिसांनी नकार दिल्याने तो थेट पोलिसांच्या गाडीसमोर झोपला आणि आपली गाडी जोपर्यंत सोडणार नाही, तोपर्यंत आपण उठणार नाही, अशी भूमिका घेतली. सदरचा प्रकार पाहून अनेक प्रवाशी सभोवताली गर्दी करत आळंदी शहर व देहू फाट्यावर वाहने पार्किंग करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच सर्वत्र सम – विषम तारखेचे फलक बसविण्यात यावेत, तोपर्यंत वाहनांवर कारवाई करू नये अशी मागणी केली. दरम्यान पोलिसांनी मात्र झोपलेल्या दुचाकी मालकाला बाजूला केले. त्याची समजूत काढून दंड भरून घेतला. त्यांनंतर त्याची मोटरसायकल त्याच्या ताब्यात देण्यात आली. पुणे शहर आणि अनेक ठिकाणी दुचाकी पार्किंग बाबत अद्यापही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेकजण रस्त्यावर अथवा जागा मिळेल तिथे गाडी पार्क करत असतात. पण टोईंग कारवाई झाल्यास शेकडो रूपयांच्या दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

 

 

 

मोटरसायकल नो पार्किंग मध्ये असल्याने टोईंग कारवाई करण्यात आली होती. संबंधित नागरिक दंड भरण्यास तयार नव्हता. त्याने मद्यप्राशन केलेले होते. तो टोईंग गाडी समोर रस्त्यावर झोपला. असे कृत्य केल्यामुळे आपल्यावर होणारी कारवाई टळली जाईल असा त्याचा समज होता. त्या इसमास समजून सांगितल्यानंतर दंड भरून तो मोटरसायकल घेऊन गेला, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी सतीश नांदुरकर यांनी दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!