
‘यांच्याकडे हत्यारे आहेत’ म्हणत मराठा आंदोलनात तरुणाचा गोंधळ
मराठा आंदोलनात गोंधळ घालणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, मराठा आंदोलनी तरुणाचा बुरखा फाडला, नेमके काय घडले?
मुंबई – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. मुंबईतील आझाद मैदानात हे आंदोलन सुरू असून, मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव आले आहेत. पण या दरम्यान एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे मराठा बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे दोन तीन दिवस होऊनही मराठा आंदोलनात एकही चुकीची घटना घडलेली नाही. पण सध्या एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. आंदोलकांच्या गर्दीत घुसून एका समाजकंटकाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. एक तरुण गर्दीत घुसून अचानक डोक्याला पट्टी आणि जखमी असल्याचे दाखवून एक व्यक्ती मराठा आंदोलकांमध्ये घुसला. त्याने यांनी मला मारलं आहे. यांच्याकडे हत्यारं आहेत, अशी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पण मराठा बांधवानी काही क्षणातच त्या तरुणाचे पितळ उघडे पाडले. त्याला कोणतीही जखम झाली नव्हती, तो डोक्याला पट्टी आणि लाल रंग लावून तो आला होता. त्याला आंदोलकांनी पकडुन पोलिसांच्या हवाली केले. याचा व्हिडीओ शेअर करत आंदोलकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला चोरी करताना पकडून आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलं. अशा लोकांपासून समाजबांधवांनी सावधान रहावे, आजूबाजूला लक्ष ठेवावे. प्रत्येक जण आंदोलनाला आला असेल असं नाही, असे सांगत मराठा बांधवानी सतर्क रहावे असे सांगण्यात आले आहे. जरांगे यांच्या उपोषणासाठी लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत. आज शनिवारी आंदोलनाचा दुसरा दिवस असल्याने आणि राज्य सरकारकडून आंदोलकांची कोणतीच व्यवस्था न करण्यात आल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाले. आझाद मैदानावर पाणीच पाणी पाणी साचलं आहे, आम्हाला चिखलात बसावं लागतंय, तिथे कमीत कमी खडी तरी टाकावी, आमची बसण्याची व्यवस्था तरी सरकारने नीट करावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरातील फूट स्टॉल्स, हॉटेल महापालिकेच्या आदेशाने बंद आहेत. शौचालयांमध्ये पाणी नाही, अशी तक्रार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. मुंबई महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. पण महापालिकेने मराठा आंदोलकांचे आरोप फेटाळून लावले आहेत.