Just another WordPress site

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकरण आले समोर..?

पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे, प्रतिनिधी – सोशल मीडियावर मैत्रीच्या नावाखाली मुलींसोबत फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनोळखी तरुणांशी मैत्री आणि नंतर वाढती जवळीक आयुष्याला अनेक वेळा उद्ध्वस्त करते. अशा अनेक घटना समोर येत आहेत. दरम्यान पुण्यात १५ वर्षांची मुलगी या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण इतके पुढे गेले आहे की त्यांनी प्रेमामध्ये शारिरीक संबंध ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. ती प्रेग्नंट  राहिल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. याबाबत पुण्यातील एका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, त्यानंतर आरोपीचा शोध सुरू आहे.

GIF Advt

सोशल मीडियावर आढळून आलेले हे फसवणुकीचे प्रकरण पुण्यातील आंबेगाव ब्रुद्रुकचे आहे. येथे राहणाऱ्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहन दास नावाच्या तरुणाशी ओळख झाली. आधी दोघांमध्ये संवाद सुरू होता नंतर आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आश्वासन देऊन त्याने जवळीक वाढवली आणि मग एके दिवशी तिला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!