Just another WordPress site

ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्केंचा राजीनामा, कारण काय ? बातमी बघा..!

विधान परिषद निकाल लागल्यानंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. भाजपने पाच जागा जिंकत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धक्का दिला. तर शिवसेना राजीनामा  नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्केंनी राजीनामा दिला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फुट पडली आहे.  शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांनाच समर्थन असल्याचे जाहीर केले.  शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी ट्विट करत जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.  आपल्या ट्विटमध्ये म्हस्के म्हणाले, आमचा धर्म, जाक आणि गोत्र हे शिवसेना आहे. त्यामुळे आम्ही  शिवसैनिक होतो  आणि शिवसैनिक राहणार.  पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची ‘राष्ट्रवादी’ गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे.

GIF Advt

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!