Just another WordPress site

पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात,1 जणांचा मृत्यू, 30 वारकरी जखमी

सातारा प्रतिनिधी – वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागले आहे. पण, साताऱ्यात वारकऱ्यांचा गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आयशर ट्रकने धडक दिली. या अपघात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सातारा- पुणे महामार्गावर शिरवळ इथं खडाळा गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. एक भरधाव आयशर टेम्पोने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या भद्रेश्वर भाविक मंडळाची दिंडी पंढरपूर पायी वारीसाठी आळंदी ते पंढरपूर निघाली होती.

GIF Advt

शिरवळ इथं खडाळा गावाच्या हद्दीत पोहोचले असता आयशर ट्रकने पाठीमागून वारकऱ्यांच्या ट्रॉलीला जोराची धडक दिली. अचानक झालेल्या या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर आयशर ट्रक पलटी झाला आणि ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेले वारकरी बाहेर फेकले गेले. ट्रॉलीचा पाठीमागच्या भाग चक्काचूर झाला आहे.

या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर 30 वारकरी जखमी झाले आहे. जखमींपैकी 11 जण हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णवाहिकेमधून खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!