Just another WordPress site

मोठी बातमी – फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ

नागपूर विशेष प्रतिनिधी – राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात दररोज होणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तांतर नाट्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणावरून देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.

GIF Advt

शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावा, अशी मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर होईल का? अशा चर्चांना उधाण आलेले आहे. तर दुसरीकडे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल, अशी तयारी दर्शवली. यामुळे राज्यात परत एकदा भाजप आणि शिवसेनेचे सरकार अस्तित्वात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सकाळी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात अद्याप भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्यांने प्रतिक्रिया दिली नाही आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!