Just another WordPress site

शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप कापसे यांची निवड

बार्शी नगरपालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते नागेश आण्णा अक्कलकोटे यांचे कट्टर समर्थक

बार्शी/सोलापूर प्रतिनिधी – शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष पदी संदीप कापसे यांची निवड करण्यात आली . संदीप कापसे हे बार्शी नगरपालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते नागेश आण्णा अक्कलकोटे यांचे कट्टर समर्थक आहेत. बार्शी नगरपालिकेचे माजी विरोधीपक्षनेते नागेश आण्णा अक्कलकोटे यांच्या विचारावर चालणारे संदीप कापसे यांची ओळख आहे. गेली दिड वर्ष संदीप कापसे यांनी शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या बार्शी तालुकाध्यक्ष या पदावर काम करत होते. या पदावर काम करत असताना ते पद महत्वाच नसत तर त्या पदाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न असतो… त्यामुळे त्यांच्या प्रमाणिकपणे कामाची पावती म्हणूनसंदीप कापसे यांची शिवस्मारक युवा संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष सुरजी दिघे यांनी शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष पदी संदीप कापसे यांची निवड केली.

GIF Advt

यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी शिवचरित्रकार शुभम चौव्हाण व महाराष्ट्र राज्यांच्या प्रदेशाध्यक्षा धनश्री मस्के तसेच महाराष्ट्रचे सचिव अभिषेक दाभाडे व सोलापुर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हरिश भोसले यांच्या सर्वांच्या ऊपस्थितीत हा सोहळा पार पडला. सर्वांच्या साथीने व सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी जिल्हा उपाध्यक्ष पदावर राहुन प्रमाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करीन असे मत संदीप कापसे यांनी बोलताना केले.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!