Latest Marathi News
Ganesh J GIF

शेवाळवाडी फाटा येथे स्कूल बसचा अपघात,मोठा अनर्थ टळला

हडपसर प्रतिनिधी – पुणे सोलापूर हायवे वर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सकाळी शाळेत जाणारे लहान मुले मुली शेवाळेवाडी फाटा येथे उभी असतात. स्कूलची बस यूटर्न घेत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जाऊन धडकली. मागून येणाऱ्या जड वाहनाने वेळीच प्रसंगावधान दाखवत डाव्या बाजूने वाहन घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्कुल बस चा ड्रायव्हर हा नशेत आढळला आहे. हडपसर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.

पालकांच्या प्रतिक्रिया

प्रत्येक पालक हा आपल्या मुलाला चांगल्या शाळेत पाठवत असतो. बसचे पैसे देखील पूर्ण भरतो, जर ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत असतील तर मुलाची जबाबदारी कोणी घेईल असा प्रश्न पालक विचारत आहेत.

एक प्रसंग

गेल्या 5 दिवसांपूर्वी धायरी मध्ये एका 12 वर्षाच्या मुलाचा बसच्या चाकाखाली जाऊन जागीच मृत्यू झाला होता.

खाजगी बस

मुळात बस ह्या ठेकेदारी पद्धतीवर चालवल्या जातात.भाडेतत्त्वावर घेतल्या जातात. त्यामुळे शाळा ह्या त्या बस मालकावर सर्व ढकलून मोकळे होतात. शाळेकडे बस देखील उपलब्ध नाहीत. अशी परिस्थितीत पालकांनी जागे होणे गरजेचे आहे,आपल्या मुलाचा जीव गेल्यावर ह्या कडे लक्ष घालणार का ? असा प्रश उपस्थित होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!