
सातारा – सातारा हे दोन कारणांनी सध्या सगळीकडे ओळखले जातं. एक म्हणजे साताऱ्याचे राजे खासदार उदयनराजे भोसले यांच्यामुळे तर दुसरं म्हणजे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांच्यामुळे अभिजीत बिचुकले हे आपल्या वेगळ्या वेगळ्या स्टाईलमुळे सदा चर्चेत असणारं नाव. आताही ते वेगळ्या कारणाने चर्चेत आलं आहे. आता बिचुकले हे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या साताऱ्यात रंगत असून ती राज्यात ही रंग धरू लागली आहे. तर यावर अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रीया देताना, हे सत्य असून आपण प्रयत्न करत असल्याचे म्हटलं आहे. तर या निवडणूकीसाठी 100 आमदारांचा पाठिंबा लागतो. त्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून त्यात किती यश मिळतो हे येत्या चार दिवसात कळेत असेल त्यांनी म्हटलं आहे.