Latest Marathi News
Ganesh J GIF

एकनाथ खडसेंचा तीन वर्षांनंतर संपला वनवास..!

मुंबई विशेष प्रतिनिधी –  गेल्या तीन वर्षापासून माजी मंत्री राष्ट्रवादीचे  नेते एकनाथ खडसे विधिमंडळापासून दूर आहेत. आज अखेर त्यांचा हा वनवास संपला आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे. एकनाथ खडसे यांनी पहिल्या पसंतीची २७ मत घेत विजय मिळवला आहे.

भाजपमधील अंतर्गत राजकारणातून त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे यांना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्येही नाव दिले होते, पण राज्यपाल यांनी ती यादी राखून ठेवली. त्यामुळे खडसे यांचा विधिमंडळातील प्रवेश लांबला होता, पण आज विधान परिषद निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी विजय मिळवला आहे.

राज्यात २०१४ मध्ये भाजपचे सरकार आल्यापासून एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. तेव्हापासून एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजपमध्ये असल्याचे दिसत होता. अखेर खडसे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले. यातून त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. पुन्हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीवरुन डावलले होते. त्यामुळेही ते भाजपवर नाराज होते. यातून त्यांनी पक्षाला राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

विधान परिषदेच्या निवडुकीत एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यापासून त्यांच्या उमेदवारीवरुन चर्चा सुरु झाली होती. भाजप खडसे यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती, भाजपला विधिमंडळात एकनाथ खडसे यांना प्रवेश करु द्यायचा नव्हता अस बोलले जात आहे, यासाठी भाजपमधील नत्यांनी प्रयत्न केले होते. पण अखेर एकनाथ खडसेंनी विधान परिषदेत विजय मिळवत विधिमंडळात प्रवेश केला आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!