
विधान परिषद निकाल लागल्यानंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. भाजपने पाच जागा जिंकत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धक्का दिला. तर शिवसेना राजीनामा नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्केंनी राजीनामा दिला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांनाच समर्थन असल्याचे जाहीर केले. शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी ट्विट करत जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये म्हस्के म्हणाले, आमचा धर्म, जाक आणि गोत्र हे शिवसेना आहे. त्यामुळे आम्ही शिवसैनिक होतो आणि शिवसैनिक राहणार. पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची ‘राष्ट्रवादी’ गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे.
भगवे आमचे रक्त तळपते,तप्त हिंदवी बाणा..
जात,गोत्र अन् धर्म अमुचा
शिवसेना , शिवसेना ,शिवसेना…!
शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच..
पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे.
जय महाराष्ट्र!@uddhavthackeray— Naresh Mhaske (@nareshmhaske) June 25, 2022