
पुणे विशेष प्रतिनिधी – शिरुर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आढळराव पाटील यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केलं होतं. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी तर त्यांच्या घरी जाऊन हात पाय तोडण्याची भाषा केली होती. या धमकी प्रकरणात आता खेड पोलिसांत 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 17 जणांच्या यादीत गणेश सांडभोर, राम गावडे, महेंद्र घोलप, अमोल विटकर, सचिन पडवळ, निलेश वाघमारे, कुमार ताजणे, गोरक्ष सुखाळे, सुरेश चव्हण, शंकर दाते, नवनाथ कोतवाल, काका कुलकर्णी, दत्ता भांबुरे, तुषार सांडभोर,बबनराव दौंडकर, चंद्रकांत भोर, बाजीराव बुचडे (सर्व रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांच्या नावांचा समावेश आहे. याबाबत आंबेगाव तालुक्याचे शिवसेना विभाग प्रमुख अंकुश शेवाळे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.